कल्याण : लैंगिक अत्याचाराला कंटाळून नैराश्यातून एका तरुणीने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना कल्याणात उघडकीस आली होती.
या प्रकरणी कोलशेवाडी पोलिसांनी आठ जणांवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली. आज भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पीडित तरुणीच्या कुटुंबीयासह पोलिसांची भेट घेतली.