Share

मुलाला धमकी आल्यानंतर वसंत मोरे आक्रमक! म्हणाले, “इतकेच लक्षात ठेव…”

Published On: 

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त १४ जून रोजी वसंत मोरे यांनी भव्य रोजगार मेळावा घेतला होता. या मेळाव्याचे नियोजन हे वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे यांनी केले होते. मात्र या कार्यक्रमादरम्यान रुपेश मोरे यांच्या चारचाकी गाडीच्या वायपरमध्ये धमकीची चिट्ठी ठेवण्यात आल्याने पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे.

या कार्यक्रमादरम्यान एका शाळेच्या आवारात रुपेश मोरे यांनी चारचाकी गाडी लावली होती. याच ठिकाणी गाडीच्या वायपरमध्ये ‘सावध राहा रुपेश’ अशी चिट्ठी ठेवण्यात आल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे.  वसंत मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने, याबाबत आता भारती विद्यापीठ पोलीस पुढील तपास करत आहेत. आता या धमकीच्या पत्रानंतर वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वसंत मोरे म्हणाले, “मुलगा म्हटले की प्रत्येक बापाचा अभिमान असतो आणि बाप म्हटले की प्रत्येक पोराचा आयडॉल असतो. आमचेही अगदी तसंच आहे, पण कोणाला तरी हे का खटकतंय तेच समजत नाही. राजकारणात काम करत असताना अनेकदा कळत नकळत कधी कोण शत्रू होतो तेच समजत नाही, तसा रुपेश कोणाच्या अध्यातमध्यात नसतो तरीही असे का ? हाच प्रश्न मनाला चटका लावून जातोय. आपण रात्रंदिवस जनतेचा विचार करायचा त्यांची कामं करायची आणि कोणी तरी आपल्या कुटुंबाबाबतीत असा विचार करायचा ? हे का तेच कळत नाही”. तसेच पुढे बोलताना वसंत मोरे यांनी “तू जो कोणी असशील तो पुसट असा कॅमेऱ्यात दिसतोय. बाबा फक्त इतकेच लक्षात ठेव त्याचा बाप वसंत मोरे आहे…!” असा इशाराही धमकी देणाऱ्याला दिला आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!