मुंबई : भारतीय संघाचा श्रीलंका दौरा सुरुवातीपासुनच या ना त्या कारणाने सतत चर्चेत राहिला आहे. या दौऱ्यासंदर्भात बीसीसीआयवर दुय्यम संघ पाठवुन श्रीलंका क्रिकेट बोर्डाचा अपमान केला असे रणतुंगा म्हणाले होते. या प्रकरणावर आकाश चोप्राने रणतुंगाला सडोतोड उत्तर दिले होते.
मात्र आता रणतुंगाच्या विरोधात त्यांचाच सहकरी आणि माजी क्रिकेटपटु अरविंद डिसल्वाने त्याला आरसा दाखवला आहे. ‘श्रीलंकेच्या दौऱ्यावर आलेल्या भारतीय संघाला दुय्यम समजनं ही खुप मोठी चुक ठरेल’ असे ते म्हणाले. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले,’श्रीलंकेच्या दौऱ्यावर आलेल्या भारतीय संघाला कुणीही कमी लेखु नये. त्यांना कमी लेखणे ही चुक ठरु शकते. या संघाला पराभुत करणे हे श्रीलंका क्रिकेट संघासाठी एक आव्हानच आहे.’ असे तो म्हणाला.
या दौऱ्यात श्रीलंकेने जर भारतीय संघाला पराभूत केले तर आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेपुर्वी हे खुप मोठं यश असेल. कोरोना आणि बायोबबलमुळे दोन संघाची रचना ही अवश्यक झाली आहे. भविष्यात भारताप्रमाणे इतर देशही या प्रकारे दोन संघाची बांधणी करतील. काही दिवसापुर्वी ‘भारताने श्रीलंका दौऱ्यावर दुय्यम संघ पाठवुन श्रीलंका क्रिकेटचा अपमान केला’ असे अर्जुना रणतुंगा म्हणाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘द्रविडने भारताचा मुख्य कोच बनू नये’ जाफरने केलं मोठ विधान
- कोरोना प्रादुर्भावामुळे श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत घेण्यात आला ‘हा’ निर्णय
- राज्यात आज 10,458 रुग्णांना डिस्चार्ज, तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- मोदींच्या मंत्रिमंडळातील अनेक नेते पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचेच -अजित पवार
- आम्हालाही चांगलं जगण्याचा हक्क; लसीकरणानंतर तृतीयपंथीयांच्या भावना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

