उस्मानाबाद : उस्मानाबाद तालुक्यातील पळसप ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी एकहाती सत्ता मिळवली आहे. पळसप हे विक्रम काळे यांचं मूळ गाव आहे. पळसपमध्ये महाविकास आघाडीविरुद्ध भाजप असा सामना होता. पळसप ग्रामपंचायतीत एकूण 13 जागा आहेत. त्यातील 8 जागा बिनविरोध झाल्या होत्या. 5 जागांसाठी निवडणूक पार पडली. त्यामुळे पळसपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 7, शिवसेनेला 5 आणि 1 अपक्ष उमेदवार निवडून आलाय. भाजपला मात्र इथे भोपळाही फोडता आला नाही.
कळंब तालुक्यातील बोर्डा ग्रामपंचायतीवर राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वातील पॅनलनं निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. 7 जागांच्या या ग्रामपंचायतीवर 6 जागांवर भाजपनं विजय मिळवला आहे. तर एका जागेवर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय मिळाला आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी चांगलाच जोर लावला होता. पण भाजपचे जिल्हाध्यक्ष नितील काळे यांच्या नेतृत्वातील भाजपच्या पॅनलचा विजय मिळवला आहे.
शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे गाव असलेल्या गोवर्धनवाडीत 9 पैकी 6 जागांवर शिवसेनेने विजय मिळवलाय. तर भाजपने 3 जागांवर विजय प्राप्त केलाय. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येनंतर गोवर्धनवाडी हे गाव पूर्णपणे ओमराजे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते. मात्र, आता राजकीय समीकरण बदलल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे गोवर्धनवाडीचा निकाल हा ओमराजे यांच्यासाठी आत्मचिंतनाचा विषय झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- गेवराई तालुक्यात राष्ट्रवादीचा डंका
- युपीत लव्ह जिहादचा तमाशा : नसिरुद्दीन शाह
- कोरोना महामारीमुळे मी पत्नीचं चुंबनही घेऊ शकलो नाही; फारुख अब्दुल्लांची व्यथा
- नाथाभाऊंनी भाजपला जागा दाखवली, मुक्ताईनगरमध्ये भाजपचा उडाला पुरता धुव्वा !
- नेपोटिजम आणि बॉलिवूड माफियांपेक्षाही याची जास्त भीती वाटते : कंगना रानौत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
