Share

राष्ट्रवादीच्या ‘या’ दमदार आमदाराला कोरोनाची लागण

Published On: 

पुणे : गेले ५ महिने कोरोनाने राज्यासह पुण्यात कहर माजवला आहे. आतापर्यंत राज्यातील अनेक लोकप्राधिनिधी, समाजसेवक, मंत्री ते बॉलिवूड स्टार्स पर्यंत अनेकांना कोरोनाने विळखा घातला आहे. यातच, काल पुण्यातील आणखी एका आमदारांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

पुण्यातील वडगाव शेरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल टिंगरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. काल रात्री त्यांनी याबाबत ट्विट केले असून आपल्याला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले. ” सुरुवातीचे काही लक्षणे दिसत असल्याने, मी कोरोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझ्यातील लक्षणे सौम्य असून खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल झालो आहे. गेल्या काही दिवसात मुख्य संपर्कात आलेल्या सर्वांना मी विनंती करतो कि स्वतःला विलगीकरणात ठेवावे व काळजी घ्यावी” असे ट्विट त्यांनी केले आहे.

पुण्याच्या माजी महापौरांनाच नाही मिळू शकला बेड, तर मृत्यूनंतरही अंतिम संस्कारात आल्या अडचणी

दरम्यान, पुणे महापालिकेचे माजी महापौर दत्तात्रय गोविंद तथा दत्ता एकबोटे यांचे मध्यरात्री सव्वा बाराच्या दरम्यान करोनाने ससून रुग्णालयात निधन झाले. ते ८४ वर्षाचे होते. एकबोटे यांना करोना झालाय हे समजताच त्यांनी अनेक रुग्णालयाशी संपर्क साधला, पण सुरुवातीला त्यांना कुठेच जागा उपलब्ध झाली नाही.तर, निधनानंतरही त्यांच्या अंत्यसंस्कारात अडचणी निर्माण झाल्या. निधनानंतर त्यांचं पार्थिव प्रथम कैलास स्मशानभूमीत नेण्यात आले. तिथे जागा नसल्याने त्यांना येरवडा इथं नेण्यात आले. आणि त्यानंतर कोरेगाव पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या आणखी एका भावाचे निधन

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!