Share

‘…पण आता मॉफ़् ला माफी नाही’, व्हायरल झालेल्या ‘त्या’ फोटोंवर राष्ट्रवादीचे स्पष्टीकरण

Published On: 

नवी-दिल्ली : मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant patil) हे मागील चार दिवसांपासून दिल्लीत असून काल(२६ नोव्हें.)त्यांनी गृहमंत्री अमित शहांची(Amit Shah) भेट घेतली. असे असतांनाच यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) देखील राजधानीत दाखल झाले आणि त्यांनी अमित शहांच्या भेट घेतली. फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची बंद दाराआड तीन तास चर्चाही झाली.

तसेच संसदेचे हिवाळी अधिवेशन असल्याने शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) दिल्लीत रवाना झाले आहेत. यादरम्यान, शरद पवारांनीही मुंबईतील नियोजित कार्यक्रम रद्द करून त्यांनी राजधानी गाठली आहे. त्यामुळे वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राज्यातील नेत्यांनी एकाच वेळी दिल्लीची वाट धरल्यामुळे सगळीकडे चर्चा सुरू झाल्या आहेत. तसेच सध्या सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांची भेट झाल्याचा फोटो व्हायरल होत असून यामध्ये शरद पवार देखील फडणवीसांच्या बाजूला बसल्याचे दिसत.

दरम्यान, या व्हायरल झालेल्या फोटोंवर आता राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून उत्तर देण्यात आले आहे. अधिवेशनाच्या तोंडावर सरकार पाडण्याच्या ‘गजाल्या’ सुरू झाल्यात. त्यासाठी ‘असले’ मॉफ़् केलेले बचकांडे हातखंडे. पण आता मॉफ़् ला माफी नाही.फसव्या फोटोशॉप जल्पकांचा (ट्रोल्स) शोध घेणं अवघड नाही, असे पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून सांगण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!