Share

राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, दुष्काळी परिस्थितीवर केली चर्चा

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असताना राज्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे यात त्यांनी राज्यातील दुष्काळावर चर्चा केली.

या भेटीत ‘सरकारने फळबागा वाचविण्यासाठी अतिरिक्त मदत द्यावी. पशुधन वाचविण्यासाठी निधी वाढवावा. शेतकऱ्यांकडून होत असलेली सर्व प्रकारची वसुली त्वरित थांबवावी. कर्जमाफी व कर्ज पुनर्गठनाबाबत निर्णय घ्यावा. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क माफ करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशा विविध मागण्या यावेळी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या. या शिष्टमंडळात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे, राजेश टोपे यांचा समावेश होता.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्य सरकारवर दुष्काळाबाबत सरकार गंभीर नाही अशा शब्दात टीका केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!