🕒 1 min read
पंढरपूर : दोन दिवसापूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या यावर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीला फुशारक्या मारण्याची सवय अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला. ते पंढरपूर येथे बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व शरद पवार यांची दिल्लीत शनिवारी भेट झाली या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांची यावर प्रतिक्रिया आली. माझे मंत्री सदाभाऊ खोत पंढरपूरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पंतप्रधान भेटीवर विचारलं असता राष्ट्रवादीला फुशारक्या मारण्याची सवय असून चारशे खासदार असलेले पंतप्रधान कशाला चार खासदार असलेल्यांचा सल्ला घेतील अशा शब्दात त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला.
वेगवेगळ्या कामानिमीत्त प्रत्येक जण पंतप्रधानांची भेट घेत असतात. मात्र महाविकास आघडीतील विशेष म्हणजे राष्ट्रवादी मधील कार्यकर्त्यांना फुशारकी मारण्याची सवय आहे. ज्यांचे 3-4 खासदार आहेत त्यांचा सल्ला 400 खासदार असणारे @narendramodi कशाला घेतील? @NCPspeaks https://t.co/bNZwbeOok1
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) July 19, 2021
ते म्हणाले, वेगवेगळ्या कामानिमीत्त प्रत्येक जण पंतप्रधानांची भेट घेत असतात. मात्र महाविकास आघडीतील विशेष म्हणजे राष्ट्रवादी मधील कार्यकर्त्यांना फुशारकी मारण्याची सवय आहे. ज्यांचे 3-4 खासदार आहेत त्यांचा सल्ला 400 खासदार असणारे पंतप्रधान मोदी कशाला घेतील दरम्यान, आघाडी सरकारने वारकऱ्यांना परवानगी नाकारली असून मुख्यमंत्री मात्र पंढरपुरात दाखल होत आहेत. आघाडी सरकारची हुकूमशाही आहे असे ते यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठी पाऊल पडते पुढे! मराठी चित्रपट आता आंतरराष्ट्रीय महोत्सवात झळकणार
- छत्री, मोदी आणि कॉंग्रेस! सोशल मीडियावर मोदींचा स्वावलंबीपणा व्हायरल
- ‘पेगासस’ प्रकरणावर मोदी, शाहांनी स्पष्टीकरण द्यावे; संजय राऊतांची मागणी
- ‘राज्य चालवता न आलेल्या माणसाने गाडी चालवली यात काय मोठा पराक्रम?’ निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
- ‘आमची मुंबई’चे ढोल बडवणारे सेलेब्रिटी आता कोणत्या बिळात लपले?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
