Share

नंदुरबार झेडपी सभापतीपदासाठी राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस नेत्यांचे गुडघ्याला बाशिंग

Published On: 

🕒 1 min read

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपाचा पराभव करत दणदणीत विजय मिळविला होता. ११ सदस्यांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला ४ तर महाविकास आघाडीला ७ जागा मिळाल्या आहेत. आता सभापती पदासाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीनही पक्षांनी दावा केला आहे. त्यामुळे २५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषदेतील ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर नंदुरबार जिल्हा परिषदेतील एकूण ११ जागा रिक्त झाल्या होत्या. त्याची नुकतीच पोटनिवडणूक झाली आहे. या निवडणुकीचा महाविकास आघाडीला मोठा फायदा झाला. काँग्रेस, आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा वाढून मिळाली आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीनही पक्षांचे पदाधिकारी सभापती आमचाच असे म्हणत गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.

येत्या २५ ऑक्टोंबर रोजी उपाध्यक्ष आणि दोन सभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया घेण्यात येणार आहे. त्यात शिवसेनेला उपाध्यक्ष आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला सभापती पद मिळणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे नेमकं सभापती पद कुणाकडे आणि उपाध्यक्ष पद कुणाकडे हे २५ ऑक्टोबर रोजीच स्पष्ट होणार आहे. मात्र आघाडी सरकारमधील तीनही पक्षाचे कार्यकर्ते हे गणितं ठरविण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!