पुणे : चाकण एमआयडीसी आणि खेड सेझमधील स्थानिक कामगारांना कामावरुन काढण्यात येत असल्याचा प्रकार सध्या सुरु आहे. त्यामुळे कामगारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हेंच्या जनता दराबारात आपलं गऱ्हाणे मांडलं.
खासदार अमोल कोल्हेंनी मतदारसंघातील राजगुरुनगरमध्ये जनता दरबार घेतला. यावेळी कामगारांसह युवकांनी त्यांच्या व्यथा कोल्हेंसमोर मांडल्या. राज्याचे कामगार मंत्री, आमदार, खासदार यांची कार्यक्षेत्र वेगळी असतात, असं कोल्हे म्हणाले.
तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘राज्याचा कामगार मंत्री आणि आमदार, खासदारांची कामं वेगळी आहेत. कामगारांबाबत कामगार मंत्र्यांना नर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कामगारांच्या विषयाचा फक्त पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करु शकतो”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले.
दरम्यान, आपल्याला न्याय मिळेल या आशेने कामगार अमोल कोल्हे यांच्या जनता दरबारात गेले होते. “साहेब तुमच्या एका फोनने आम्हाला आमचा कामाचा हक्क मिळेल”, असं कामगार अमोल कोल्हेंना म्हणाले. मात्र, त्यावेळी अमोल कोल्हेंनी न्याय देण्याऐवजी कागदी घोडे नाचवत आदेशाची मागणी करत कामगारांच्या विषयाला बगल दिला, असा आरोप कामगारांकडून करण्यात आला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

