🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा:- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसला अजून एक मोठा धक्का बसला आहे.राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार पक्षांची साथ सोडणार आहे . कर्जत खालापूरचे विद्यमान आमदार सुरेश लाड हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.सुरेश लाड हे सुनील तटकरे यांच्या सर्वात जवळचे सहकारी आहेत.
सुरेश लाड हे शिवबंधन बांधून, आता शिवसेनेतून विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. सुनील तटकरे यांचा सख्खा पुतण्या अवधूत तटकरे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता सुरेश लाड यांनीही सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने, तटकरेंसाठी आणि पर्यायाने राष्ट्रवादीला हे मोठे धक्के आहेत असे मानले जात आहे.
राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत सुरेश लाड हे शिवसेनेत प्रवेश करणार असले तरी शिवसेनेने कर्जत मतदारसंघातून महेंद्र थोरवे यांना शिवसेनेकडून तिकीट देण्याची तयारी केली आहे. आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना एबी फॉर्म दिला असून त्यांची उमदेवारी निश्चित केली आहे.
दरम्यान सुरेश लाड हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत 1999 मध्ये लाड कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र 2004 मध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.त्यानंतर 2009 आणि 2014 मध्ये लाड पुन्हा निवडून आले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1178619392134766592?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1178619577812447233?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
