Share

निवडणूक आयोग म्हणजे देशाला लागलेला कलंक – जितेंद्र आव्हाड

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्यातील लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान होत आहे, यामध्ये महाराष्ट्रातील १७ जागांसह देशभरातील ७२ जागांचा समावेश आहे. मुंबई विभागातील सर्व मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे, मतदारांनी देखील चौथ्या टप्यात उस्फूर्त प्रतिसाद दिल्याने मतदानाची आकडेवारी वाढताना दिसत आहे.

आज सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावत आपला हक्क बजावला आहे, मतदार याद्यांमध्ये काही प्रमाणात घोळ असल्याने अनेकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे नाव एका यादीत आणि मतदान दुसऱ्या केंद्रावर आल्याने मतदानासाठी एका केंद्रावरून दुसऱ्या केंद्रावर जाव लागलं.

दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस आ जितेंद्र आव्हाड यांच्या वडिलांचे दोन वर्षापूर्वी निधन झाले असताना देखील अद्याप त्यांचे नाव मतदार यादीमध्ये कायम आहे, यामुळे संतापलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोग म्हणजे देशाला लागलेला कलंक असल्याची भावना व्यक्त केली आहे.

वडील दोन वर्षापूर्वी वारले, मात्र अजूनही त्यांचे नाव यादीमध्ये कायम आहे, तर जिवंत असणाऱ्याची नावे सापडत नाहीत, निवडणूक आयोग वाईट पद्धतीने काम करत आहे. असा संताप आव्हाड यांनी व्यक्त केला.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!