मुंबई : अभेनेत्री कंगना रणौतने मुंबईबद्दल केलेल्या विधानामुळे शिवसेना आणि कंगणामध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. कंगनाने ट्विटवर मी ९ सेप्टेंबरला येत आहे काय करायचं ते करा असे विधान केले होते. यावरून कंगनाला धमक्याही आल्या होत्या. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव कंगनाला केंद्र सरकारकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.
केंद्राकडून सुरक्षा दिल्यानंतर कंगनाने देखील ट्वीट करत अमित शाह यांचे आभार मानले आहेत. ती म्हणाली, ‘आता कोणत्याही देशभक्ताचा आवाज दाबला जाणार नाही हे यावरुन सिद्ध होतंय. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानते. त्यांना वाटलं असतं तर ते मला काही दिवसांनंतर मुंबईत जाण्याचा सल्ला देऊ शकले असते. मात्र, त्यांनी भारताच्या या मुलीचा मान राखला आहे. त्यांनी माझ्या स्वाभिमान आणि आत्मसन्मानाची रक्षा केली आहे. जय हिंद.’
कंगनाला केंद्राकडून वाय दर्जाची सुरक्षा , मानले अमित शहांचे आभार
मात्र यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या वंदना चव्हाण यांनी कंगना राणावत हिला चांगलच फैलावर घेतल आहे. ‘माय मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणून अपमान करणाऱ्या दिड शहाणीला माफी मागितल्याशिवाय मुंबईत राहण्याचा अधिकार नाही. तिची सर्व मालमत्ता सील करावी. देशभक्त नव्हे!’ मोदीभक्त’ कंगनाने शहांच्या छत्रछायेत रहावे.माय मुंबईला तिची गरज नाही!’ असा घणाघात चव्हाण यांनी केला आहे.
माय मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणून अपमान करणाऱ्या दिड शहाणीला माफी मागितल्याशिवाय मुंबईत राहण्याचा अधिकार नाही. तिची सर्व मालमत्ता सील करावी. देशभकत नव्हे!" मोदीभकत"कंगनाने शहांच्या छत्रछायेत रहावे.माय मुंबईला तिची गरज नाही!
.
.@rautsanjay61 @priyankac19@aadeshbandekar— Vidya Chavan (@Vidyaspeaks) September 7, 2020
तर दुसरीकडे यावरून आता राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अनिल देश्मुख यांनी देखील भाजप सरकारवर कडाडून टीका केली आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांना केंद्र सरकारकडून वाय दर्जाची सुरक्षा मिळत असेल तर हा निर्णय गंभीर, आश्चर्यकारक, दु:खद आहे. मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल वक्तव्य करणाऱ्यांचा सगळ्या पक्षांनीच निषेध करायला हवा अस अनिल देशमुख म्हणाले आहेत.
राम कदम म्हणजे भाजपचे ‘झांसे के राजा’…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

