Share

राम कदम म्हणजे भाजपचे ‘झांसे के राजा’…

Published On: 

मुंबई : अभेनेत्री कंगना रणौतने मुंबईबद्दल केलेल्या विधानामुळे शिवसेना आणि कंगणामध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. कंगनाने ट्विटवर मी ९ सेप्टेंबरला येत आहे काय करायचं ते करा असे विधान केले होते. यावरून कंगनाला धमक्याही आल्या होत्या. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव कंगनाला केंद्र सरकारकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

यावरूनच आता कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजप आपला अजेंडा चालवणाऱ्यांची खूप काळजी घेतात म्हणूनच कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आल्याचा घणाघात सावंत यांनी केला आहे. तर, ‘भाजपाचे ‘झांसे के राजा’ आमदार राम कदम यांनी कंगना राणावत सारख्या व्यक्तीमत्वाची तुलना झाशीची राणी लक्ष्मीबाईशी केली त्याबद्दल देशाच्या जनतेची माफी मागावी. इतिहासात झाशीच्या राणीचा एवढा मोठा अपमान कोणी केला नाही.’ अस ट्विट करत सचिन सावंत यांनी भाजप आमदार राम कदम यांच्यावर जोरदार शरसंधान साधाल आहे.

दुसरीकडे बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना खासदार यांच्यातील सामना चांगलाच रंगला आहे. दरम्यान, कंगनाने अहमदाबादला मिनी पाकिस्तान म्हणून दाखवाव अस आव्हान संजय राउत यांनी दिल्यानंतर या वादात गुजरात भाजपने उडी घेतली आहे.

संजय राऊतांच्या तोंडाला काळ फासणार, गुजरात भाजप आक्रमक

संजय राऊत यांच्या या विधानावरून गुजरातभाजपासह काँग्रेसही कमालीची संतप्त झाली आहे. गुजरातमधील करणी सेनेने त्यांचा पुतळा जाळला आहे. तर भाजपा नेते अल्पेश ठाकोर यांनी संजय राऊत यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला आहे.

खासदार संजय राऊत यांनी कंगनाची माफी मागावी – तृप्ती देसाई

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!