मुंबई : काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी एका भाषणादरम्यान, सरस्वतीवर एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुठलेही फोटो काढले जाणार नाहीत. कुणाला काहीही वाटेल. त्यांना वाटेल ते आम्ही करणार नाही. जे लोकांना वाटतं तेच आम्ही करणार आहोत, अशी प्रतिक्रिया दिली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या हेमा पिंपळे यांनी अप्रत्यक्षपणे भाजप पक्षावरही निशाणा साधला आहे.
काय म्हणाल्या हेमा पिंपळे ?
भाजप एकनाथ शिंदेंच्या आडून महाराष्ट्रात, हुकूमशाही आणि मनुस्मृतीचं राज्य आणू पाहत आहे. एकनाथ शिंदेंच्या डोक्यात वाक्य घालून देण्याचं काम भाजपची पिलावळ करत आहेत, अशी टीका हेमा पिंपळे यांनी एकनाथ शिंदे आणि अप्रत्यक्षपणे भाजपवर केली आहे. पिंपळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
एकनाथ शिंदे हे भाजपने वापरलेलं एक हत्यार-
पुढे त्या असंही म्हणाल्या की, एकनाथ शिंदे हे भाजपने वापरलेलं एक हत्यार असून, ते आरएसएसच्या ओंजळीने पाणी पितात. भाजपाने एकनाथ शिंदेंच्या तोंडातून ही भाषा वधवली आहे.
तसेच, सर्वांनी आपल्या श्रद्धा आपल्याजवळ जोपासल्या पाहिजेत. ज्या सावित्रीबाई फुले यांनी महिलांना घरातून बाहेर काढत स्त्री-शिक्षणाची मुहूर्तवेढ घातली, त्यांना आपण शिक्षणाची देवता मानायचं नाही का? याचं उत्तर भाजपाने दिलं पाहिजे.
महत्वाच्या बातम्या :
- Kishori Pednekar | “स्वत:च्या बाळाला बाजूला ठेवून दुसऱ्याच्या बाळाला…”; किशोरी पेडणेकरांचा भाजपवर निशाणा
- Shivsena Vs Shinde | सत्ता संघर्षाचा निकाल तब्बल एक महिना लांबला, ‘या’ तारखेला होणार निर्णय
- Bacchu Kadu | “मी कानशिलात लगावली नाही तर…” ; ‘त्या’ VIDEO वर बच्चू कडूंचे स्पष्टीकरण
- Congress । गहलोत, शशी थरुर यांच्यानंतर आता अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये ‘हे’ नाव आहे सर्वात जास्त चर्चेत!
- Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांची मोठी घोषणा, ‘या’ ठिकाणी घेणार दसरा मेळावा


