Share

भाजप-शिवसेना युतीची सत्ता यावी ही लोकभावना होती, राष्ट्रवादीच्या नेत्याची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : महापालिकेतील काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना हा सत्तेचा फॉर्म्युला राज्यातही अवलंबिला जाणार आहे. परिणामी, महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार येईल. त्यामुळे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा, हे स्वप्न पूर्ण होणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

वास्तविक भाजप-शिवसेना युतीची सत्ता यावी, ही लोकभावना होती. परंतु, नियतीला ते मान्य नव्हते. भाजपची सत्ता येऊ नये, अशीच नियतीची इच्छा होती. काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसण्याचा जनादेश मिळाला होता. परंतु, राजकीय पेच निर्माण झाला. भाजपने शिवसेनेला दिलेले वचन पाळले नाही. अडीच वर्षे शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यास भाजपने नकार दिला. गेल्या पाच वर्षांत भाजपने शिवसेनेची ताकद कमी करण्याचाच प्रयत्न केला. त्यामुळेच शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस अशी आघाडी होत आहे, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना कोल्हापूरच्या विकासासाठी भरघोस निधी आणला. थेट पाईपलाईनला पाचशे कोटींसह रस्ते व तीर्थक्षेत्रासाठीही निधी आणला. परंतु, पाच वर्षांपूर्वी भाजपचे सरकार आल्यावर त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून ही कामे प्रलंबित ठेवली. थेट पाईपलाईनमध्ये भाजपने खोडा घातल्यानेच अजून काम रेंगाळले आहे. अतिवृष्टीने शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असूनही भाजपने निधी दिला नाही. स्मार्ट सिटीचे स्वप्न भंगले. मात्र, शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार आल्यानंतर वर्षभरात सर्व प्रलंबित विकासकामे मार्गी लावू. अस देखील मुश्रीफ म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1195260153383178240?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1195255917530370048?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1195252542470381568?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!