🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : गेल्या महिनाभरापासून सुरु असलेला सत्तासंघर्ष आज अखेर संपणार आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आज शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाची शपथ घघेणार आहेत. यासाठी राज्यातील आणि देशातील राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांना आमंत्रण देण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेवर सडकून टीका करण्यासाठी प्रसिद्ध झालेले राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी यावर प्रतिकिया दिली असून निर्णयाचं कौतुक केलं आहे.
आजचा सूर्योदय महाराष्ट्राच्या पुढील अनेक वर्षाची दिशा ठरवणारा आहे. आदरणीय पवार साहेबांनी सर्व राज्याला एक उज्वल भविष्य दिलंय. त्यांच्या संकल्पनेतील ‘महाविकासआघाडी’च्या सरकारला तसेच या पुरोगामी राज्याचा शिवधनुष्य लिलया पेलणाऱ्या माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यशस्वी राजकारणाच्या लक्ष शुभेच्छा अस अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
आजचा सूर्योदय महाराष्ट्राच्या पुढील अनेक वर्षाची दिशा ठरवणारा आहे. आदरणीय पवार साहेबांनी सर्व राज्याला एक उज्वल भविष्य दिलंय.त्यांच्या संकल्पनेतील "महावि आघाडी"च्या सरकारला तसेच या पुरोगामी राज्याचा शिवधनुष्य लिलया पेलणाऱ्या माननीय CM @uddhavthackeray यांना यशस्वी राजकारणाच्या pic.twitter.com/kc7bxtSXwD
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) November 28, 2019
लक्ष सदिच्छा..
!— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) November 28, 2019
दरम्यान, राज्यातील नाट्यमय घडामोडींनंतर अखेर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन करत आहे. नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला असून आज संध्याकाळी ६. ४० वाजता दादर येथील शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1199922006101086208?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1199921973737844739?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1199913392472870912?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
