मुंबई – मागील वर्षी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकार स्थापन केलं होतं. अडीच दिवस टिकलेल्या या सरकारची सर्वत्र चर्चा झाली. यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजवणाऱ्या पहाटेच्या शपथविधीचे सूत्रधार शरद पवार हेच होते, असं खळबळजनक विधान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
फडणवीस यांनी केलेला दावा राष्ट्रवादीने फेटाळून लावला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी चुकीचे वक्तव्य करून आघाडीत गैरसमज पसरवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी बिघाडी काही होणार नाही उलट आघाडी सरकार मजबूत होईल हे फडणवीसांनी लक्षात ठेवावे असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिला आहे.
शरद पवार हेच पहाटेच्या सरकारचे सूत्रधार असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर महेश तपासे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.भाजप सरकार आले नाही म्हणून आलेल्या आघाडी सरकारमध्ये बिघाडी कशी होईल ही खोड काही देवेंद्र फडणवीस यांची गेलेली दिसत नाही. त्यांनी कितीही चुकीची अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला तरी बिघाडी होत नाही हे लक्षात ठेवावे.भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यामध्ये आदरणीय खासदार शरद पवारसाहेब यांचा हात होता हे जनतेलाही माहीत आहे याची आठवणही महेश तपासे यांनी देवेंद्र फडणवीस यांना करुन दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुंबईतील महिला व वकील संघटनांनी दिल्या शक्ती कायद्यासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना
- प्रजासत्ताक दिनी राजपथावर घडणार महाराष्ट्राच्या संत परंपरेचं दर्शन
- मराठा आरक्षणाची आजची सुनावणी स्थगित; पुढील सुनावणी 5 फेब्रुवारी रोजी होणार
- मुलींच्या जुडो कराटे, योगा व जीवन कौशल्य प्रशिक्षणाच्या अनुदानात वाढ
- वाद बाजूला सारून एकदिलाने गावाच्या विकासासाठी निष्पक्षपणे काम करा : आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

