🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसने सरकारवर निशाणा साधला. फडणवीस सरकारने मोठा गाजावाजा करत सुरू केलेली ‘जलयुक्त शिवार’ ही फसवी योजना असल्याचं आता उघड झालंय, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या NCP या आॅफिशियल ट्विटर अकाउंट वरून केली आहे.
विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. विरोधकांकडून सरकारला कोंडीत पकडण्याचे काम सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप, टीका-टिप्पणी सुरु आहे. याचदरम्यान राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसने सरकारवर निशाणा साधला. बाळासाहेब चौधरी यांनी पुरंदर तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेत अनियमितता झाली असल्याची तक्रार केली होती. विधानपरिषदेत आज प्रश्नोत्तराच्या तासात या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला असताना जलसंधारण विभागाने जलयुक्त शिवाराच्या कामात अनियमितात झाल्याची कबुली दिली आहे, असे राष्ट्रवादीने म्हंटले आहे.
इतकेच नव्हे तर देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा गाजावाजा करत सुरू केलेली ‘जलयुक्त शिवार’ ही फसवी योजना असल्याचं आता उघड झालंय. जलयुक्त शिवारच्या कामात गैरव्यवहार झाल्याची कबुली आता सरकारनेच दिली आहे, असेही राष्ट्रवादीने म्हंटले आहे.
देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा गाजावाजा करत सुरू केलेली ‘जलयुक्त शिवार’ ही फसवी योजना असल्याचं आता उघड झालंय. जलयुक्त शिवारच्या कामात गैरव्यवहार झाल्याची कबुली आता सरकारनेच दिली आहे. @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @ShivSena pic.twitter.com/We4LKACmqK
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) June 24, 2019
बाळासाहेब चौधरी यांनी पुरंदर तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेत अनियमितता झाली असल्याची तक्रार केली होती. विधानपरिषदेत आज प्रश्नोत्तराच्या तासात या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला असतांना जलसंधारण विभागाने जलयुक्त शिवाराच्या कामांत अनियमितात झाल्याची कबुली दिली आहे.
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) June 24, 2019
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
