टीम महाराष्ट्र देशा :- राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आठवडा उलटल्यानंतर देखील सत्तास्थापनेसाठी भाजपा आणि शिवसेनेत चढाओढ सुरु आहे.महायुतीत मुख्यमंत्री पदावरून तेढ निर्माण झाली असल्याचे चित्र आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी-काँग्रेसला दोघात तिसऱ्याला लाभ अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मोठे विधान केले आहे.
मलिक म्हणाले की, त्यांच्या पक्षासाठी कोणाताही पक्ष अस्पृश्य नाही. जर भाजप आणि शिवसेनेने सरकार बनवले नाही तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला सरकार बनविण्यासाठी मार्ग शोधेल.भाजप राष्ट्रपती राजवटीविषयी आणि इतर पर्यायांविषयी बोलत आहे, परंतु त्यासाठी निवडणुका घेण्यात आल्या नाहीत, असेही ते म्हणाले.शिवसेनेबाबत थोडी नरमाईची भूमिका घेत मलिक म्हणाले की, शिवसेनेने बर्याच काळापासून अन्याय सहन केला आहे आणि लोकांनीही ते पाहिले आहे.
तसेच, शिवसेना शिवाजी महाराजांच्या विचारसरणीवर विश्वास ठेवते आणि शिवाजी महाराजांनी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये कधीही भेदभाव केला नाही. मग वेगळ्या विचारसरणीचा प्रश्नच उद्भवत नाही. राष्ट्रवादी कधीही भाजपाला साथ देणार नाही, असेही मलिक यांनी स्पष्ट केले.
दरम्यान , शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी सत्तास्थापनेविषयी भाष्य करताना ‘शिवसेनेने जर ठरवलं तर बहुमत सिद्ध करू शकते असं विधान केलें आहे. तसेच जनतेचे ही इच्छा आहे की शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा असं विधान केले आहे. त्यामुळे शिवसेनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठींबा स्वीकारण्याविषयी एक पाउल पुढे टाकल्याचे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1190254552496214016?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1190257170895425536?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1190257517420376064?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

