वॉशिंग्टन : जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना आजाराने जगभर सर्व क्षेत्रावर परिणाम घडवून आणला. याचाच परिणाम अमेरिकेत 3 नोव्हेंबरला होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकांमध्ये कोरोना व्हायरस सर्वात मोठा मुद्दा बनत असल्याचे दिसत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बचाव आणि स्वच्छतेच्या मुद्रेत आहेत. डेमोक्रेट कँडिडेट बायडेन यांनी शुक्रवारी म्हटले की – कोरोना नियंत्रित करण्याच्या प्रकरणात ट्रम्प अॅडमिनिस्ट्रेशन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. जर मी राष्ट्राध्यक्ष झालो तर अमेरिकेत मोफत व्हॅक्सिन देण्यात येईल. मग त्याचा विमा असो किंवा नसो.
त्यामुळे बिहार निवडणुकांमध्ये भाजपच्या जाहिरनाम्यात प्रसिद्ध केल्याप्रमाणेच अमेरिकेत देखील डेमोक्रेट कँडिडेट बायडेन यांनी सत्तेत आलो तर बिहारमधील लोकांना मोफत व्हॅक्सिन देण्यात येईल.बायडेन यांची टीका तिसर्या अध्यक्षीय चर्चेनंतर बायडेन डेलावेयरच्या विलमिंग्टन येथे दाखल झाले. इथल्या रॅली दरम्यान ते म्हणाले की, ट्रम्प म्हणतात की, त्यांनी कोरोनाविरूद्ध चांगला लढा दिला. परंतु, मी म्हणतो की या मुद्दयावर ते अयशस्वी झाले. जर हे यश असेल तर मग अपयश कसे असेल? प्रत्येक अमेरिकेन नागरिकाने याचा विचार केला पाहिजे. जेव्हा आम्हाला सुरक्षित आणि प्रभावी लस मिळेल. मी वचन देतो की ती प्रत्येक अमेरिकन नादकितासा विनामूल्य उपलब्ध करुन दिली जाईल. मग तुम्ही विमा केलेला असो किंवा नको.
सरकार खरेदी करणार व्हॅक्सिन बायडेन याच रॅलीत पुढे म्हणाले की, मी विश्वास देतो की, व्हॅक्सिनची खरेदी पूर्णपणे फेडरल गव्हमेंट करेल. ज्यांना गरज आहे त्यांना अगोदर व्हॅक्सिन देण्यात येईल. बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर महामारीची खिल्ली उडवणे आणि हे गांभिर्याने न घेण्याचाही आरोप लावला. ते म्हणाले – आपल्या समोर मोठा धोका आहे. येणाऱ्या हिवाळ्यात व्हायरस जास्त धोकादायक ठरु शकतो. अमेरिकेने यासाठी तयार राहायला हवे.
महत्वाच्या बातम्या
- भारताने ओलांडला 10 कोटी चाचण्यांचा टप्पा पार; जाणून घ्या कोरोनाबाबतची ताजी आकडेवारी
- प्रविण दरेकर आणि राधाकृष्ण विखे यांना काय चॉकलेट देवून आणलं का ? – खडसे
- खडसे साहेब शेतकरी कमकुवत झाला आहे, तिथं तुमची ताकद दाखवा – प्रवीण दरेकर
- दिवाळीपूर्वी शेतकरी आणि नुकसानग्रस्त बांधवांच्या हातात मदत पोहोचेल- उद्धव ठाकरे
- ‘एक वर्ष पक्षात असणारा व्यक्ती ४० वर्षे पक्षात राहिलेल्या व्यक्तीवर काय टीकाटिपण्णी करणार’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

