Share

महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये माओवाद्यांचा हैदोस

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : गडचिरोलीत झालेल्या भ्याड हल्ल्यातून देश अजून सावरलेला नसताना बुधवारी रात्री उशिरा बिहारमध्ये नक्षलवाद्यांनी चार वाहने पेटवून दिली. गया जिल्ह्यातील बाराचट्टी भागात रस्ते निर्मितीच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या जेसीबी आणि ट्रॅक्टरला नक्षलवाद्यांनी आग लावली.

नक्षलवाद्यांचा विकासकामांना विरोध असल्याने ३० नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या कामासाठी वापरले जाणारे तीन जेसीबी आणि एक ट्रॅक्टर पेटवून दिले. वाहनांना आग लावल्यानंतर नक्षली झिंदाबादच्या घोषणा देत हे नक्षलवादी घटनास्थळावरुन निघून गेले. नक्षलवाद्यांच्या या कृत्यांमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

दरम्यान,गडचिरोलीत झालेल्या भ्याड हल्ल्यात १५ जवान शहीद झाले. नक्षलवाद्यांनी सी-६० कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे हल्ला केला. या हल्ल्याला उत्तर म्हणून लष्करातर्फे जांभूळखेडा परिसरात कोबिंग अँड सर्चिंग ऑपरेशन सुरु आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!