🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. मुंबईत परिषदेत बोलत असतांना नीरज गुंडे ड्रग्ज व्यवसायिक असून तो फडणवीस सरकारच्या काळात वाद झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा दूत बनून उद्धव ठाकरेंना मांडवलीसाठी भेटायचा, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे.
मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने मुंबईमध्ये ड्रग्सचा व्यवसाय सुरू होता. या व्यवसायाला फडणवीसांचे संरक्षण होते, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. यावेळी ते म्हणाले की, ड्रग्स पेडलर असलेला जयदीप राणा हा सध्या तुरुंगात आहे. त्याचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध आहे. महाराष्ट्रातील ड्रग्सच्या खेळाचे मास्टर माईंड हे देवेंद्र फडणवीस आहेत की काय अशी आम्हाला शंका आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.
मलिकांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मलिकांविरोधात भाजप नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. यानंतर आता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनीही या वादात उडी घेत नवाब मलिक यांना इशारा दिला आहे. सदाभाऊंनी फडणवीस यांच्या समर्थनात एक ट्विट पोस्ट केले आहे.
नवाब मिया जनाब आप गलत खेत मे घूस रहे हो..!!
वो #देवेंद्_फडणवीस हे पुरे कपडे फाड देते हे
अब आपको चुन चुन के 'हर्बल डोस' मिलेगा ..@Dev_Fadnavis @nawabmalikncp— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) November 1, 2021
‘नवाब मिया जनाब आप गलत खेत मे घूस रहे हो..!! वो देवेंद्र फडणवीस हे पुरे कपडे फाड देते हे. अब आपको चुन चुन के ‘हर्बल डोस’ मिलेगा’ या शब्दांत सदाभाऊंनी मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, त्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांचे आरोप फेटाळून लावले होते. तसेच नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांबाबतचे पुरावे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपवणार असल्याचा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यामुळे हे प्रकरण आणखीन वाढणार असे दिसतेय.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भारतात मुस्लीम नाही, कायम हिंदू व्होट बँक होती, आहे व राहील’, असदुद्दीन ओवैसींचे खळबळजनक वक्तव्य
- हॅलोविन लूकने’अप्सरा’ सोनालीने चाहत्यांना केले घायाळ..
- इंधन दरवाढीचे सत्र सुरूच! लवकरच पेट्रोल १२० रुपयांचा टप्पा गाठणार
- यहॉं तो पुरी सरकारही काँच से बनी है; पडळकरांचे राज्य सरकारवर ताशेरे
- ‘…त्यानंतर त्याने माझ्यावर आरोप केले’, अनिल देशमुखांनी केला खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

