मुंबई : ड्रग्ज प्रकरणात आता नवाब मलिक विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा सामना सुरु झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ड्रग्स पेडलरसोबत संबंध असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच नीरज गुंडे ड्रग्ज व्यवसायिक असून तो फडणवीस सरकारच्या काळात वाद झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा दूत बनून उद्धव ठाकरेंना मांडवलीसाठी भेटायचा, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे.
मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने मुंबईमध्ये ड्रग्सचा व्यवसाय सुरू होता. या व्यवसायाला फडणवीसांचे संरक्षण होते, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. ड्रग्स पेडलर असलेला जयदीप राणा हा सध्या तुरुंगात आहे. त्याचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध आहे. महाराष्ट्रातील ड्रग्सच्या खेळाचे मास्टर माईंड हे देवेंद्र फडणवीस आहेत की काय अशी आम्हाला शंका आहे, असेही मलिक म्हणाले.
मलिकांच्या या आरोपांवर आता भाजप नेते आक्रमक झालेत. भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी नवाब मलिकांचा हा आरोप अत्यंत हास्यास्पद असल्याचं म्हटले आहे. ‘ज्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात एवढे चांगले काम केले, त्या मुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारचा आरोप केला जातोय. हा आरोप अत्यंत हास्यास्पद आहे’, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
दरम्यान, नवाब मलिक यांनी केलेला आरोप फडणवीस यांनी फेटाळून लावला होता. तसेच नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांबाबतचे पुरावे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपवणार असल्याचा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्याला आता नवाब मलिक यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलेय. है तैयार हम असे केवळ तीन शब्दांचे ट्विट केले. त्यामुळे ऐन दिवाळीमध्ये फडणवीस आणि नवाब मलिक यांच्यामध्ये राजकीय जुगलबंदी रंगण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भारतात मुस्लीम नाही, कायम हिंदू व्होट बँक होती, आहे व राहील’, असदुद्दीन ओवैसींचे खळबळजनक वक्तव्य
- हॅलोविन लूकने’अप्सरा’ सोनालीने चाहत्यांना केले घायाळ..
- इंधन दरवाढीचे सत्र सुरूच! लवकरच पेट्रोल १२० रुपयांचा टप्पा गाठणार
- यहॉं तो पुरी सरकारही काँच से बनी है; पडळकरांचे राज्य सरकारवर ताशेरे
- ‘…त्यानंतर त्याने माझ्यावर आरोप केले’, अनिल देशमुखांनी केला खुलासा


