Share

पाकिस्तानातून येणारा ड्रग्ज राज्यात पोहोचविण्याचे काम नवाब मलिकांकडून सुरू; नितेश राणेंचा गंभीर आरोप

Published On: 

🕒 1 min read

सिंधुदुर्ग: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे एनसीबीच्या कारवाईवरून गंभीर आरोप करत आहेत. याच दरम्यान आता भाजप नेते नितेश राणे यांनी मलिक यांच्याविरोधात आरोपांची फैरी झाडल्या आहेत. ‘मलिक हे पाकिस्तानचे एजंट आहेत. पाकिस्तानचे जे ड्रग्ज माफिया आहेत. नवाब मलिक त्यांचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत’, असा गंभीर आरोप राणे यांनी केला आहे.

मराठी माणूस असलेले एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांना चिरडण्याची भाषा मलिक करत आहेत. तरीही शिवसेनेचे सगळे नेते गप्प असून आता शिवसेनेची मराठी अस्मिता गेली कुठे? असा सवालही राणे यांनी केला. सिंधुदुर्ग येथील प्रहार भवन येथे राणे यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर टीकची झोड उठवली आहे.

ते म्हणाले, नबाव मलिक हे पाकिस्तानचे ड्रग्ज माफिया आहेत. त्यांच्यामुळे भविष्यातील पिढी खराब होणार आहे. त्यामुळेच एनसीबीने ड्रग्ज माफियांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. पण नवाब मलिक हे एनसीबीला बदनाम करत आहेत. माफियांची हिंमत वाढविण्याचे काम करत आहेत. जावयाला अटक केली म्हणून ते एनसीबीवर टीका करत आहेत. काम करणाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण होत आहे हे त्यांना कळत नाही, अशी टीका नितेश राणे यांनी केली.

नवाब मलिकांच्या घरी गांजा सापडला नव्हता तर डब्यात हर्बल सापडला होता असा दावा शरद पवार करत आहेत. आता या हर्बलबाबतची थोडी माहिती आमच्या कोकणातील शेतकऱ्यांनाही द्यावी. कारण, उद्या हर्बलचे पीक आले तर ते विकत घ्यायला नवाब मलिक आहेतच. तसेच मलिक यांचा जावई घरामध्ये दोनशे, तिनशे हर्बलचा स्टॉक करून ठेवतो. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला हर्बलचा सगळा माल नवाब मलिक यांच्या जावयाने विकत घ्यावा अशी आमची मागणी आहे असा टोलाही त्यांनी लगावला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!