Share

‘चंद्रकांत पाटलांनी शिवस्मारकात पैसे खाल्ल्याचं सिद्ध करूनचं दाखवू’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : ‘आम्ही काम थांबवणार नाहीत पण भ्रष्टाचार झालाय तो उघड करू असे मलिक म्हणाले. मी आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी कागदपत्रांच्या आधारे हे समोर आणले होते, असे राष्ट्रवादी नेते नवाब मलिक माध्यमांशी बोलताना म्हणाले.

ते म्हणाले, ‘चंद्रकांत पाटील यांनी शिवस्मारकात पैसे खाल्ल्याचं सिद्ध करून दाखवू असे मलिक म्हणाले. तसेच शिवस्मारकासंदर्भात वरिष्ठ अधिकारी वर्क ऑर्डर द्यायला तयार नव्हते. कनिष्ठ अधिकार्यांनी वर्क ऑर्डर दिली होती. कॅगच्या अहवालातही गैरव्यवहार झाल्याचे ताशेरे त्यांनी ओढले, असे मलिक म्हणाले.

तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अधिवेशना पूर्वी माध्यमांसमोर येऊन खूप दिवसांपासून प्रलंबित असलेल्या शिवस्मारकाबाबत भाष्य केले आहे. तर चौकशी लावून शिवस्मारकाचा प्रकल्प रेंगाळत ठेवण्याचा सरकारचा डाव आहे, असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला.

दरम्यान, शिवस्मारक प्रकल्पातील गैरव्यवहाराची चौकशी केली जाईल, असे उद्धव ठाकरे म्हंटले होते. यावर पाटील म्हणाले की, अरबी समुद्रातील शिवस्मारक ही राज्यातील जनतेची अनेक वर्षांची इच्छा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला १५ वर्षांच्या काळात शिवस्मारकासाठी एकही परवानगी आणता आली नाही. मात्र, गेल्या पाच वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सर्व परवानग्या आणून कामाला सुरुवातही केली. हीच गोष्ट महाविकासआघाडीला खटकत आहे. चौकशी लावून शिवस्मारकाचा प्रकल्प रेंगाळत ठेवण्याचा सरकारचा डाव आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1206455615083565057?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1206453769422008320?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!