मुंबई : मागील काही दिवसांपासुन सुरु असणाऱ्या हिंसाचारामुळे दिल्लीप्रमाणेच राजकीय वातावरणदेखील चांगलेच तापले आहे. सीएए आणि एनआरसीच्या मुद्द्यावरून सुरु असलेल्या हिंसाचारावरून अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी अमित शहांना लक्ष्य केले आहे. ”दिल्ली जाळायला येणारा असे नादिर शहाला ओळखले जाते. आता अमित शहा हे नादिर शहा झाले आहेत, असा टोला मलिक यांनी लगावला आहे.
तसेच यावेळी त्यांनी सोशल मिडिया सोडण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या संकेताचेही मलिक यांनी स्वागत केले आहे. सोशल मिडिया सोडण्याच्या या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केले आहे. ”काही भाजप नेतेही म्हणाले आम्हीही सोशल मिडिया सोडणार. त्यांच्या भक्तांनीही सोशल मिडिया सोडलाच पाहिजे म्हणजे देशात शांतता राहिल,” असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.
अयोध्या भूमी आता विवादात नाही. देशातील नागरिकांना मंदिरात जाण्याचा अधिकार आहे. उद्धव ठाकरे आपल्या धर्मानुसार अयोध्येला जात असतील तर त्यावर प्रश्न उपस्थित करायची गरज नाही. असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचे समर्थन केले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

