Share

शिवसेना चोरावर मोर तर भाजप खातेय शहिदांच्या टाळूवरचं लोणी, राष्ट्रवादीचा हल्लाबोल

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी ह्ल्यानंतर देखील भाजपकडून निवडणूक प्रचार केला जात आहे. या हल्याचा राजकीय फायदा उठवण्याच काम भाजपकडून केलं जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे. जवानांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम भाजपकडून केलं जात आहे, अशी टीका राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

शिवसेना – भाजप युतीवर टीका करताना नवाब मलिक यांनी सेनेवर निशाना साधला आहे. भाजप हे शहिदांच्या टाळूवरच लोणी खातेय म्हणत शिवसेनेकडून टीका करण्यात आली. कालपर्यंत उद्धव ठाकरे चौकीदार चोर सांगत होते . मग आता युतीची बोलणी करून तुम्ही ‘चोरावर मोर’ आहात का, याच उत्तर देण्याचं आवाहन देखील मलिक यांनी केलं आहे.

दरम्यान, आज शिवसेना भाजप युती होणार हे निश्चित झाले आहे. आज संध्याकाळी भाजप अध्यक्ष अमित शहा हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर जाणार आहेत. या भेटीनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली जाणार असल्याचं सांगितल जात आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!