टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादी कॉंग्रेसला सेनेने धोबीपछाड दिला आहे. राष्ट्रवादीचे शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. बरोरा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश केला. मात्र यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बरोरा यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
पांडुरंग बरोरा शिवसेनेत गेल्याने काही एक फरक पडणार नाही व शाहापूरची जागा काहीही झाले तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसच जिंकेल. जनता कधीही स्वतःच्या फायद्यासाठी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना स्वीकारणार नाही. अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.
दरम्यान, शहापूरची पाणी टंचाई दूर करणे हा माझा मुख्य उद्देश आहे, शहापूरची पाणीटंचाई दूर करण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. असे बरोरा यांनी म्हंटले होत. इतकेच नव्हे तर एमआयडीसीचा विस्तार होण्यासाठी, तसेच रोजगार निर्माण होण्यासाठी मी सेनेत आलो आहे. याचबरोबर शहापूर हे तंटामुक्त आणि भगवायुक्त करण्यासाठी शिवसेनेत आलो, असेही बरोरा यांनी म्हंटले. तसेच आदिवासी भागाचे प्रबोधन करणे हाही माझा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी म्हंटले होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

