पुणे : संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने गावातील गरीब व रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबाला दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच गरजू लोकांसाठी अनेक मदतीचे हात देखील पुढे येत आहे. कोरोनाच्या लढ्यासाठी देशातील अनेक दिग्गज मंडळींकडून याचप्रमाणे उद्योजकांकडून मदतीचे हात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी पंतप्रधान निधीला मार्च महिन्याचे मानधन दिले आहे. पालिकेत भाजपचे तब्बल 102 नगरसेवक असून त्यानुसार २० लाख ४० हजारांचे मानधन पंतप्रधान निधीत जमा होणार आहे.
तसेच याबाबतचे महापालिका आयुक्तांनी स्वतंत्र मदत निधीही सुरू केला आहे. त्यानुसार महापालिकेतील भाजप नगरसेवकांचे मार्च महिन्यांचे मानधन पंतप्रधान निधीला देण्यात यावे असे पत्र सभागृह नेते धीरज घाटे यांनी आयुक्तांना नुकतेच दिले आहे.
दरम्यान, देशभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या देखील सतत वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून सर्वोत्तोपरी मेहनत घेतली जात आहे. देशभरातील सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर, पोलीस रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
