Share

Navneet Rana । “उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची संपत्ती जपली नाही, ती संपत्ती शिंदेंसोबत आहे”; नवनीत राणांचा ठाकरेंना टोला

Published On: 

Navneet Rana । अमरावती :  गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात रवी राणा (Ravi Rana) विरुद्ध बच्चू कडू (Bachhu Kadu) असा कलगीतुरा रंगलेला आहे. अशातच आता खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय. “उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांची संपत्ती जपता आली नाही. बाळासाहेब ठाकरे यांची संपत्ती म्हणजे त्यांच्या आजूबाजूची माणसं. ही माणसंच उद्धव ठाकरे यांना जपता आली नाहीत”, असं म्हणत नवनीत राणा (Navneet Rana) यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

एका बाजूला उद्धव ठाकरेंवर टीका करतानाच नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलंय. न्यायालयात जेव्हा कागदपत्र सादर करण्याची वेळ आली तेव्हाही उद्धव ठाकरे ते कागदपत्र सादर करू शकले नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना कुठल्याही प्रकारचा संघर्ष नाही. कारण बाळासाहेबांची संपत्ती शिंदेंसोबत आहे, असं विधान नवनीत राणा यांनी केलं आहे.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सुनावणी झाली. यावर नवनीत राणा यांची प्रतिक्रिया देताना नवनीत राणा यांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय. सत्ता संघर्षाचा मुद्दा न्यायालयात आहे. त्यामुळे त्यावर बोलणं उचित नाही. पण मला एवढंच सांगायचंय की, येत्या काळात महायुती अशीच घट्ट राहील. शिंदे आणि फडणवीस असंच एकत्र राहून महाराष्ट्राच्या हिताचं काम करतील, असा विश्वास आहे. जनतेचे आशिर्वाद त्यांच्या पाठिशी आहेत. त्यामुळे 2024 लाही युतीचीच सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

शिंदे-फडणवीस सरकारमधील लोक नाराज असल्याचं ठाकरेगटाचे नेते म्हणताहेत. पण त्यांना हे बोलण्याचा अधिकार नाही. कारण याआधीच ठाकरेंना सोडून आमदार एकनाथ शिंदेंसोबत आले आहेत. त्यामुळे आमच्या सरकारमधील आमदार नाराज आहेत, असं म्हणणं चुकीचं आहे, असं नवनीत राणा म्हणाल्या. दरम्यान त्यांच्या या विधानावर उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!