टीम महाराष्ट्र देशा: रेल्वे परीक्षा (Railway Exam) ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी केंद्र सरकार (Central Government) द्वारे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये भारतीय मध्य रेल्वे (Indian Central Railway) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 596 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तरी, इच्छुक उमेदवारांनी या पदांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी https://cr.indianrailways.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
भारतीय मध्य रेल्वे (Indian Central Railway) मध्ये विविध पदांच्या एकूण 596 जागा
भारतीय मध्य रेल्वे यांच्यामार्फत एकूण 596 पदांसाठी पदानुसार पात्रधारक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये लघुलेखक, वरिष्ठ व्यावसायिक लिपिक सह तिकीट लिपिक, गुड्स गार्ड, स्टेशन मास्टर, कनिष्ठ लेखा सहाय्यक, कनिष्ठ व्यावसायिक लिपिक सह तिकीट लिपिक आणि लेखा लिपिक इत्यादी पदांचा समावेश आहे.
शैक्षणिक पात्रता
भारतीय मध्य रेल्वे यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती भरती प्रक्रियेसाठी पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरविण्यात आली आहे. तरी पदानुसार पात्रधारक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी https://cr.indianrailways.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
nmk.co.in या अधिकृत वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय मध्य रेल्वेच्या या पदांसाठी इच्छुक उमेदवार 28 नोव्हेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.
महत्वाच्या बातम्या
- Anil Desai । “माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले”, म्हणणाऱ्या फडणवीसांवर ठाकरे गटाकडून पलटवार
- Ashok Saraf | “अशोक सराफ ह्यांची ऊर्जा आणि…” ; ‘व्हॅक्युम क्लिनर’ नाटक पाहिल्यानंतर राज ठाकरे यांचे गौरवउद्गार
- Nilesh Rane | “विरोधी पक्षनेते एक शब्दही बोलत नाहीत, दोन्ही काँग्रेसने ठाकरेंना…”, निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला
- Maharashtra Winter Update | राज्यात सर्वत्र थंडीची लाट, तर पुण्यात कमाल तापमानाची नोंद
- Breaking News | शिवसेना कोणाची? ४ आठवड्यानंतर होणार पुढील सुनावणी


