Share

झारखंडच्या जनतेने नरेंद्र मोदी, अमित शहांच्या अहंकाराचा चकनाचूर केला : नवाब मलिक 

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : ” झारखंडच्या जनतेने नरेंद्र मोदी, अमित शहांच्या अहंकाराचा चकनाचूर केला, ” असा टोला राष्ट्रवादीचे नेते नवाब मलीक यांनी लगावला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनी आटोकाट प्रयत्न करूनही भाजपवर पराभवाची नामुष्की ओढवली. अशा शब्दात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

ट्विट करत नवाब मलिक यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. झारखंडच्या जनतेने नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या अहंकाराचा चकनाचूर केल आहे. तर हा लोकशाहीचा विजय असल्याचे सुद्धा मलीक म्हणाले आहे. झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला असून राज्य भाजपाच्या हातून जाणार असल्याचं आकडेवारीतून दिसत आहे.”

त्यानंतर मलिक म्हणाले, ‘ सुधारित नागरिकत्व कायदा आणून वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न भाजपानं करुन पाहिला. मात्र मोदी-शहांचे प्रयत्न वाया गेले. झारखंडमधील जनतेनं भाजपाला नाकारलं. महाराष्ट्रापाठोपाठ आता झारखंडदेखील भाजपाच्या हातातून निसटला आहे. आता भाजपचा अहंकार धुळीस मिळाला असल्याचा म्हणत नवाब मलीक यांनी भाजपावर निशाणा साधला.

दरम्यान, आज झारखंडमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. यात भाजप २३ जागांनी पिछाडीवर असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रापाठोपाठ आता भाजपानं झारखंडमधील सत्तादेखील गमावली असल्याचे चित्र जवळपास स्पष्ट झाल्याचे चित्र दिसत आहे. झारखंडमधील सत्ता कायम राखण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांनी संपूर्ण ताकद लावली होती.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1209063023723171840?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1209060902206525440?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!