🕒 1 min read
मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील नट्टू काका हे पात्र साकारणारे अभिनेते घनश्याम नायक हे कर्करोगाशी झुंज देत होते. मात्र त्यांची झुंज अपयशी ठरली आहे. रविवारी ३ ऑक्टोबर रोजी वयाच्या ७८ वर्षी त्यांनी रूग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.
https://www.instagram.com/p/CUmCOUjo7P1/?utm_source=ig_web_copy_link
‘तारक मेहता…’ मधील अनेक कलाकारांनी नट्टू काकांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजेरी लावली. मालिकेत जेठालालचं पात्र साकारणारे कलाकार दिलीप जोशी यांच्यासोबत कायक्रमाचे निर्माते असित कुमार मोदी देखील घनश्याम यांच्या अंत्यदर्शनासाठी आले होते. कोरोना नियमांचे पालन करत कांदिवली पश्चिम येथे घनश्याम यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यापूर्वी घनश्याम यांच्या अंतिम दर्शनासाठी आलेल्या काही कलाकारांचे फोटो पाहायला मिळत आहेत.
याआधी नट्टू काकांनी आपली शेवटची इच्छा व्यक्त केली होती. नट्टू काकांना मेकअप करूनच अखेरचा प्रवास करायचा होता. एका कलाकाराने व्यक्त केलेली ही अखेरची इच्छा सगळ्यांच मन हेलावणारी होती. त्यांना अगदी शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचं असल्याचे त्यांनी म्हंटले होते.
https://www.instagram.com/p/CUl-JYroJEa/?utm_source=ig_web_copy_link
गेल्या ५५ वर्षांपासून नट्टू काका सिनेसृष्टीत कार्यरत होते. अनेक चित्रपटात त्यांनी काम केले आहे. मात्र ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेमुळे त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली. नट्टू काका हे तारक मेहता या मालिकेत सुरुवातीपासून जोडलेले होते. मात्र त्यांच्या अचानक जाण्याने तारक मेहतामधील सर्व कलाकार भावूक झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- योगी सरकारच्या भ्याड कृत्याचा निषेध, दडपशाहीने लोकांचा आवाज दाबता येणार नाही – जोशी
- कोरोनामुळे अनाथ झालेल्या ३०६ बालकांच्या खात्यात सुमारे १५ कोटी ३० लाख रुपये जमा
- ‘काळजी करू नका, तुम्हाला मदत मिळवून देणारच’, फडणवीसांची शेतकऱ्यांना ग्वाही
- ‘या’ नियमांचे पालन करणाऱ्या भाविकांनाच तुळजाभवानी मंदिरात प्रवेश दिला जाणार
- ‘रिक्त पदे भरण्याबाबत राज्य शासनाचे ‘तारीख पे तारीख’ धोरण उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या मुळावर येत आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
