Share

राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी बजावली साधू-पुरोहितांना नोटीस

Published On: 

नाशिक – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राम मंदिराच्या ऐतिहासिक भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे. आज दुपारी 12.30 वाजता हा सोहळा पार पडेल. या सोहळ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. तसंच या परिसरात जाण्यासाठी निमंत्रण पत्रिकांवर हाय सिक्युरिटी कोड देण्यात आले आहे. या द्वारेच निमंत्रितांना भूमिपूजनाच्या स्थळी प्रवेश देण्यात येणार आहे. दरम्यान, भूमिपूजनाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून निमंत्रितही या ठिकाणी येण्यास सुरुवात झाली आहे.

राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील मंदिरं खुली करा अशी मागणी हिंदूत्वावादी संघटनांनी केली होती. पण, राज्यात कोरोनाची परिस्थिती पाहता आणि कलम 144 लागू असल्याने जिल्ह्याधिकाऱ्यांनी परवानगी देण्यास नकार दिला आहे.

नाशिकमध्ये मंदिरं खुली करा अशी मागणी करणाऱ्या साधू, संत, महंत, पुरोहित यांना कलम 149 ची नोटीस बजावण्यात आली आहे. शहरातील रामकुंड, गोदा घाट येथील राम स्तंभ अभिषेक, पूजा अर्चा, गोदानदी पूजन अर्थात महाआरती करण्यास मनाई करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

भूमिपूजनाच्या दिवशीही टीका-टिपण्णी सुरूच,श्रेयवादाच्या मुद्द्यावरून सामनातून भाजपवर टीका

राम मंदिरामुळे देशात ‘रामराज्य’ स्थापित होईल – रामदेव बाबा

मोठी बातमी: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली कोरोना चाचणी! अहवाल आला…

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!