नाशिक – नाशिकच्या डॉक्टर वसंतराव पवार मेडीकल कॉलेज, हॉस्पिटलमध्ये काल एका एम डी डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. डॉक्टर स्वप्निल शिंदे असे मयताचे नाव असून तो गायनॅकॉलॉजिच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. मेडिकल कॉलेजच्या वॉशरूममध्ये त्याचा मृतदेह आढळून आला आहे.
दरम्यान, दोन सीनियर मुलींकडून रॅगिंग केली जात होती आणि या त्रासाला कंटाळून मुलाचा घातपात झाल्याचा स्वप्निलच्या कुटुंबियाचा आरोप आहे. छळ होत असल्याबाबत कॉलेज प्रशासनाला याआधी देखील कल्पना दिली होती मात्र दुर्लक्ष केल्याचाही आरोप करण्यात येत आहे. कॉलेज प्रशासन आणि दोन सीनियर मुलींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. आडगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
स्वप्नीलच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपांनंतर कॉलेज प्रशासनाकडून आरोपांच खंडन करण्यात आलं आहे. स्वप्नील शिंदे या विद्यार्थी डॉक्टरला वेळो वेळी सहकार्य केल्याची माहिती कॉलेज प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, स्वप्नील याने सहा महिन्यांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार सुद्धा उघडकीस आला आहे. इतकेच नाहीतर आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी त्याने एक सुसाईड नोट लिहिली होती ज्यामध्ये दोन मुलींची नावे लिहिण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे टॉप फाईव्हमध्ये!
- शर्यतीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी पडळकरांनी हाकली बैलगाडी, पाहा व्हिडिओ
- लॉर्डसवर शमीची ऐतिहासिक कामगिरी ; सचिन-कोहलीसह या दिग्गजांनाही टाकले मागे
- ‘हिंदू हो तो डर के रहो.. ये है उद्धव का नया महाराष्ट्र!’, नितेश राणेंचा हल्लाबोल
- ‘कोमार्य चाचणी विषय राष्ट्रीय पातळीच्या अभ्यासक्रमातून वगळावा’, अंनिसचे मंत्री भारती पवारांना निवेदन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

