Share

नाशिक जिल्ह्याने करून दाखवले ; तब्बल ‘इतके’ गावं कोरोनामुक्त

Published On: 

नाशिक : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशासह राज्यात अक्षरशः हाहाकार माजवला होता. अनेक लोकांना आपल्या आप्तेष्ठांना गमवावे लागले होते. मात्र आता ही लाट आता ओसरत चालली आहे. अशात नाशिक जिल्ह्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.

नाशिक जिल्ह्यात तब्बल 260 गावं कोरोनामुक्त झाले आहेत. त्यात बागलाण तालुक्यातील सर्वाधिक 81 गावांनी कोरोनावर मात केली आहे. तर अनेक गाव कोरोना मुक्तीच्या उंबरठ्यावर आहेत. ग्रामीण भागात कोरोनाला अटकाव होत असल्याने प्रशासकीय यंत्रणेला धीर मिळाला आहे.

दरम्यान, जिल्ह्यात कोरोना रुग्ण घटत असले तरी बळींचे प्रमाण सातत्याने चाळीसहून अधिक राहत आहे. शुक्रवारीदेखील ( ४ जून ) ९३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, नवीन बाधितांची संख्या ५८५ इतकी कमी असली तरी बळींची संख्या ४० आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ४,८७० वर पोहोचली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!