मुंबई – सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार अनेक सेलिब्रेटी मंडळीना बोलावतात.मात्र, काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचाराला उपस्थित राहून कुस्तीपटू आणि एसीपी नरसिंग यादव अडचणीत आला आहे.
नियमानुसार कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला निवडणुकीत उमेदवाराचा प्रचार करता येत नाही. असे असून देखील काँग्रेसचे उत्तर पश्चिमचे उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचारात नरसिंह हे सहभागी झाले होते.
यादव हा सध्या मुंबई पोलीस दलात एलए – ५ मध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) पदावर कार्यरत आहे. त्यामुळे पोलीस दलात कार्यरत असून देखील नरसिंग यादव हा उत्तर मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम याचा प्रचार करत असल्याचं पुढे आल्यानंतर त्याच्याविरोधात अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
