Share

माफ करा आम्हाला, पोलीस व डॉक्टरांनो आमचा आत्मा मेला आहे! : मनसे

Published On: 

निलंगा (प्रदीप मुरमे ) : देशभर संचारबंदीलागू असूनही काही धर्मांध देशद्रोही लोक मात्र बेकायदेशीर जमाव जमवून कोरोना विरुद्धच्या देशव्यापी लढ्यात आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असणाऱ्या डॉक्टर व पोलिसांवरती खुले आम जीवघेणे हल्ले करत आहेत. अशा देशद्रोही व घटनेची पायमल्ली करणाऱ्या धर्मांध नराधमांना ‘दिसताच क्षणी गोळ्या घालण्या’च्या आदेशाखाली गोळ्या घालाव्यात अशी मागणी लातूर जिल्हा मनसे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

देशभरातील दुर्दैवी हल्ल्याची अशी दृश्ये बघून काळजाचा ठोका चुकत असून प्रत्येक भारतीयाची मान शरमेने खाली झुकत आहे.माफ करा आम्हाला, पोलीस व डॉक्टरांनो आमचा आत्मा मेला आहे!आजी मेल्याच दुःख नाही परंतु काळ सोकावतो!आणि यामुळे निर्माण होते अंधाधुंद परिस्थिती.ही पोलिसांवरती हल्ल्याची सवय जर काही देशद्रोही प्रवृत्तींना लागली तर हे लोक सर्वसामान्य जनतेला रस्त्याने फिरूही देणार नाहीत असं त्यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना भिकाने म्हणाले, जे पोलीस लोकांमध्ये कोरोना पसरू नये म्हणून कलम १४४ चे पालन करावे म्हणून दिवसभर रस्त्यावर पहारा देत आहेत जर त्यांनाच हे लोक जमाव जमवून मारत असल्याचे क्लीप सर्वत्र व्हायरल होत आहेत.तर हे बघून उद्या दुसरेही याची पुनरावृत्ती करु शकतात.त्यामुळे जर कायद्याची भीती मरणार तर सर्वसामान्य लोक कसे जगणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

भिकाने म्हणाले,देशद्रोही प्रवृत्तींना बळ मिळेल व देशात मोठी अराजकता माजण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे डाँ.भिकाणे यांनी म्हंटले आहे.मालेगाव येथे चक्क एका धर्मांध आमदाराने कोरोना विरुद्ध स्वतःचा जीव धोक्यात घालून लढणाऱ्या डॉ. मुंडे,डॉ. पाटील या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जमाव जमवून लाथा बुक्या घातल्या.अशा देशद्रोह्यांना वेळीच अद्दल घडवण्यासाठी व बाकीच्यांना कायद्याचा जरब बसवण्यासाठी डॉ. बाबासाहेबांच्या घटनेची आणि कायद्याची ताकत दाखवणे गरजेचे आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही अशा प्रकारे अधिकाऱ्यांचा धर्म बघून जर कोणी त्यांच्यावर असे भ्याड हल्ले करणार असेल तर अशांना चोप दिल्याशिवाय गप्प बसणार नाही.देश कोरोना च्या संकटात असताना त्यांच्या समोर हिमतीने फक्त डॉक्टर व पोलिसच उभे आहेत.सर्वजण घरात आहेत. परंतु आपला परिवार सोडून जनसेवेचे वृत घेऊन ही माणसे देश वाचवण्यासाठी उभी असताना त्यांच्या पाठीमागे आपण सर्वजण उभे राहणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. त्यामुळे या संकट समयी मनसेचा प्रत्येक सैनिक ह्या डॉक्टर व पोलिसांसोबत उभा आहे आणि भारतातील प्रत्येक व्यक्तिसुद्धा.

भिकाने म्हणाले, काही घटनाविरोधी तत्वे अशी जातीयवादी हल्ले करून दंगलीच्या माध्यमातून देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत अशांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी द्यावे असे डॉ. भिकाणे म्हणाले. अन्यथा मनसैनिक यांना योग्य वेळी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा सज्जड इशाराही डाँ.भिकाणे यांनी दिला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!