Share

केळी पिकाला योग्य मोबदला देण्याचे मोदींचे आश्वासन

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा- विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात होते. मोदी यांनी भंडारा-गोंदिया भागातील दीर्घकाळ प्रलंबित सिंचन आणि जल संवर्धनाची कामं नव्याने सुरु केलेल्या ज ल जीवन मिशन अंतर्गत वेगानं पूर्ण केली जातील असं काल साकोली इथं सांगितलं.

जाहीर प्रचार सभेत बोलताना ते म्हणाले की गोसीखुर्द धरणाची दीर्घकाळ प्रलंबित कामं आता पूर्ण होत आहेत. आगामी वर्षांमध्ये साडे तीन लाख कोटी रुपये जल शक्ति मंत्रालयाच्या अंतर्गत जल संवर्धन आणि त्याचे स्रोत उभारण्यासाठी वापरले जातील असं सांगून ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकारनं विविध केंद्रीय योजनांद्वारे विकासात आघाडी घेतली आहे.

जळगावातील केळी पिकाला योग्य मोबदला देण्यासह रस्ते, रेल्वेचे जाळे विणले जाऊन जळगावात औद्योगिक क्षेत्रात भरभराट आणून येथे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिले जातील, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगावात दिलं.

राज्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर किसान योजनेची अंमलबजावणी सुरूळीत सुरू असल्याचं सांगत आधारलिंकमुळे अडथळा येत असून तो लवकरच दूर होईल अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली. 2022 पर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येकाला घर, पाणी देण्याचा संकल्प भाजपाचा आहे, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1183664892823261186?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1183660446189940736?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!