नवी दिल्ली : 17 मे रोजी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपणार आहे. त्याआधी म्हणजेच काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत सुमारे सहा तास चर्चा केली. पंतप्रधानांनी 15 मेपर्यंत सर्व राज्यांना ब्लू प्रिंट देण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत ‘जान है तो जहान है’ असं म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींनी आता ‘जन सेवक जग तक’ हा नवा नारा दिला आहे. या नव्या नाऱ्यातच लॉकडाऊन 4 चे संकेत आहेत.
पंतप्रधानांनी काल मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधला, त्यावेळी लॉकडाऊन 4 कसा असेल या मोठ्या प्रश्नाचे संकेत खुद्द त्यांनीच दिले. या बैठकीत पंतप्रधान म्हणाले की, लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात पहिल्या टप्प्यातील आवश्यक उपायांची गरज नव्हती. अशाचप्रकारे तिसऱ्या टप्प्यातील आवश्यक उपाययोजनांची गरज चौथ्यामध्ये नाही, असं माझं मत आहे. या बैठकीत पंतप्रधान जे काही म्हणाले त्यावरुन लॉकडाऊन 4 चे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
लढा! ‘कोरोना’विरोधात : पुणे मनपातील भाजप नगरसेवकांचे मार्च महिन्यांचे मानधन पंतप्रधान निधीला
मात्र लॉकडाऊन 4 ची अजून घोषणा झालेली नाही. परंतु गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. प्रमोद सावंत म्हणाले की, 18 मेपासून लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु होईल. सोबतच यावेळी लॉकडाऊनमध्ये राज्यांना जास्त अधिकार दिल्याचंही सावंत यांनी सांगितलं.
राज्य परिवहन विभागाकडून वाहतूक सुविधेच्या माहितीसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना


