Share

राज्य परिवहन विभागाकडून वाहतूक सुविधेच्या माहितीसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना

Published On: 

लातूर : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने दि. 24 मार्च 2020 पासून लॉकडाऊन (टाळेबंदी) जारी केला आहे. परिणामी नौकरी, शिक्षण व अन्य कारणामुळे राज्याच्या विविध भागात नागरिक अडकुन राहिले आहेत. या नागरिकांना त्यांचे इच्छीत स्थळी जाण्यासाठी काही अटी व शर्तीवर परवानगी दिली आहे. त्या अनुषंगाने प्रवास करु इच्छीणाऱ्या नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाकडून मोफत वाहतूक सुविधेची माहिती होण्यासाठी रा प लातूर विभागात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यासाठी दुरध्वनी क्र. 02382-228991 यावर संपर्क साधण्यात यावा.

विभाग नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकारी, आगार व्यवस्थापक यांचे भ्रमणध्वनी व दुरध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत.

विभाग नियंत्रक स.भा. क्षिरसागर मो.नं.9422548204, दुरध्वनी क्र. 02382-228994, विभागीय वाहतूक अधिकारी (अतिरिक्त कार्यभार), सं.प. साळुंके मो.नं. 9822409932, दुरध्वनी क्र. 02382-228991, आगार प्रमुख लातूर ज.फ.कुरेशी मो.न.9421321565 दुरध्वनी क्र.02382-243626, आगार प्रमुख उदगीर य.मा.कानतोडे मो.नं.9881671293, दुरध्वनी क्र.02385-256156,आगार प्रमुख अहमदपूर स.ग. सोनवणे मो.नं.9028066005, दुरध्वनी क्र.02381-262278, आगार प्रमुख निलंगा यु.भा. थडकर मो.नं.9922850099, दुरध्वनी क्र.02384-242013, आगार प्रमुख औसा अ.द. गायकवाड मो.नं. 9860794194, दुरध्वनी क्र. 02383-222049 असे विभाग नियंत्रक रा प लातूर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

‘आमदारकीचे टेन्शन संपले’…असे म्हणत भाजपने केले CM ठाकरेंचे अभिनंदन

दरम्यान,केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सहसचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी स्थलांतरित मजुरांच्या संदर्भात माहिती दिली आहे. जवळपास पाच लाख स्थलांतरित मजुरांना सरकारकडून सोडण्यात आलेल्या 468 विशेष रेल्वेंद्वारे त्यांच्या राज्यांमध्ये पोहचण्यात आले आहे. या अंतर्गत काल (रविवार) 101 विशेष रेल्वे सोडण्यात आल्या होत्या. तसेच, वंदे भारत मशीन अंतर्गत परदेशातील जवळपास चार हजार भारतीयांना 23 विशेष विमानांद्वारे परत आण्यात आले असल्याचे पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी सांगितले आहे.

राज्याला आर्थिक दुष्टचक्रातून काढण्यासाठी 25 हजार कंपन्या सुरु : सुभाष देसाई

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!