Share

‘नारायण राणेंचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे निव्वळ विनोद, फारसं लक्ष देऊ नका’

Published On: 

🕒 1 min read

बारामती:- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’चे स्पष्ट संकेत दिले असतानाच माजी मुख्यमंत्री व भाजपचे राज्यसभा सदस्य नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा सिंधुदुर्गात येत आहेत. तोच धागा पकडून राणे यांनी राज्यातील सत्तांतरावर भाष्य केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात जात नाहीत. सरकार गतीमान आहे, असे कुठे दिसत नाही. प्रगत राहिलेला महाराष्ट्र आज सर्वच बाबतीत मागे चालला आहे. त्यामुळेच हे सरकार राज्यात राहू नये, अशी माझी मनापासून प्रार्थना आहे. अमित शहा यांच्या पायगुणामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार जाईल, असे वक्तव्य भाजप खासदार नारायण राणे यांनी केलं होतं.

दरम्यान राणे यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. नारायण राणे हे आमचे जुने सहकारी आहेत. पण ते असे विनोद करतात, हे मला माहिती नव्हते. त्यांच्या वक्तव्याकडे विनोद म्हणूनच पाहावे. नारायण राणेंच्या वक्तव्याकडे त्यापेक्षा अधिक लक्ष देण्याची गरज नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!