Share

बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त नारायण राणेंचं खास ट्विट, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:- राज्याच्या जडणघडणीचा इतिहास अभ्यासायचा असेल तर शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या योगदानाकडे कानाडोळा करुन चालणार नाही. मुंबईसारख्या शहरात मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरुन एक संघटना म्हणून नावारुपाला आलेल्या शिवसेनेने नंतर संपूर्ण राज्यामध्ये कसं प्रस्थ निर्माण केलं हे बहुतांश जणांना ठावूक आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 95 वी जयंती आहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख नेत्यांकडून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त माजी शिवसैनिक आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हिंदुत्व ज्यांचा श्वास होता आणि जन्मभर जे हिंदुत्त्वापासून तसूभरही ढळले नाहीत अशा पित्यासमान साहेबांना विनम्र आंदराजली, असे नारायण राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!