Share

मला तो प्रश्न समजला होता पण…; लोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर राणेंची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेनेतील (Shivsena) यांच्यातील वाद काही केल्या मिटण्याची चिन्हे दिसत नाही. राणे पिता-पुत्र आणि शिवसेनेतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी शिवसेनेने पुन्हा एकदा नारायण राणेंना डिवचले आहे. नारायण राणेंचा हा व्हिडीओ शिवसेनेकडून व्हायरल करुन नारायण राणेंची खिल्ली उडवली जात आहे. नारायण राणेंनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणेंनी व्हायरल झालेल्या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे.

मला खासदार कनिमोझी यांचा प्रश्न समाजाला होता, पण अधक्ष्याना वाटलं तो प्रश्न समजला नसेल असा वाटलं म्हणून अध्यक्षनी तो पुन्हा सांगितला. जे काही करायचे आहे ते करा.. मी पूर्ण तयारीने गेलो होतो. कोणतेही कागदपत्रे हातात न घेता उद्योगासंदर्भात माहिती दिली. भारत आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारचे काम सुरू आहे. अधिवेशनमध्ये कायदे करणारी बिल पास होत आहेत. सर्व काही व्यवस्थित सुरु आहे, असे नारायण राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, दिल्लीत संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डीएमकेच्या खासदार कनिमोझी यांनी इंग्रजी भाषेतून, देशातील बंद पडलेल्या आणि डबघाईला आलेल्या उद्योगांसाठी केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजना उद्योजकांपर्यंत कशा पोहोचवणार, असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला मंत्री नारायण राणेंना उत्तर व्यवस्थित देता आलं नाही, असं म्हणत शिवसैनिकांनी राणेंचा हा व्हिडीओ व्हायरल करत राणेंची खिल्ली उडवली आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!