🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राणे यांची स्थिती केविलवाणी झाली असून त्यांनी स्वत:च्या मानसिक स्थितीवर कंट्रोल ठेवावा असा सल्ला माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांना दिला आहे. ते सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेदरम्यान बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, ‘राजकारणात सातत्याने पराभवाचा सामना करावा लागल्याने नारायण राणेंना नैराश्य आले आहे. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, असे म्हणत दीपक केसरकर यांनी राणेंवर सडकून टीका केली. केसरकर यांनी केलेल्या टीकेला आता नारायण राणे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
पुढे बोलताना केसरकर म्हणाले की, सावंतवाडी नगरपरिषदेची निवडणूक दीपक केसरकर विरुद्ध नारायण राणे अशी होत असली तरी संजू परब यांच्या रूपात राणेच दिसतात, असे म्हणत भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजू परब यांच्यावर केसरकर यांनी टीका केली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी दीपक केसरकर यांच्यावर शाब्दिक निशाणा साधला होता. ‘पालकमंत्री म्हणून दीपक केसरकर हे निष्क्रीय आहेत,’ असे म्हणत राणेंनी टीका केली होती. राणेंनी केलेल्या या टीकेचे केसरकरांनी व्याजासकट परतफेड केली. केसरकर म्हणाले, मी निष्क्रिय आहे, हे मला मान्य आहे. कारण मी लोकांच्या जमिनी घेवून पेट्रोल पंप, हॉटेल आणि मल्टीप्लेक्स उभारले नाहीत, असे केसरकर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1208953975178817536?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1208946823215243264?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
