मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई हायकोर्ट कडून जोरदार धक्का मिळाला आहे. राणेंचा जुहूमधील अधीश बंगल्याच्या बांधकामाबाबत पालिकेनं आक्षेप घेतला होता. त्यानंतर नारायण राणे यांनी जुहूमधील अधीश बंगल्यातील बांधकाम नियमित केलं जावं, अशी मागणी करणारी याचिका कोर्टात दाखल केली होती. याच्या सुनावणीदरम्यान, मुंबई हायकोर्टाने नारायण राणे यांची मागणी फेटाळून लावली आहे.
नारायण राणे यांना मुंबई हायकोर्ट कडून दणकाः
राणेंनी केलेल्या मागणी याचिकेनुसार, अधीश बंगल्यातील बांधकाम नियमित करावी, अशी याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे नारायण राणेंना कोर्टाने धक्का दिला असल्याचं म्हटलं जात आहे. नारायण राणे यांचा मुंबईतील जुहूमध्ये असणारा अधीश बंगला पालिकेच्या रडारवर आला होता. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी बंगल्याची पाहणी देखील केली होती.
राणे यांच्या नोटीसीवर आज सुनावणी पार पडलीः
या बंगल्यावर पालिकेकडून कारवाई केली जाण्याची शक्यता जात वर्तवली जात होती. मुंबई पालिकेनं नारायण राणेंना नोटीस पाठवून अवैध बांधकाम पाडावं, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र, मार्च महिन्यात पाठवण्यात आलेल्या या नोटिसीच्या विरोधात जाऊन राणेंनी हायकोर्टात धाव घेतली होती. अशातच नारायण राणे यांच्या नोटीसीवर आज सुनावणी पार पडली.
दरम्यान, पालिकेने पाठवलेल्या नोटिसला नारायण राणेंचे सुपुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी उत्तर दिलं होतं. मात्र यावेळी नितेश राणे यांनी मातोश्रीवर हल्लाबोल केला होता. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यातील अवैध बांधकामाकडे पालिका दुर्लक्ष करते आणि ठाकरेंवर टीका करणाऱ्यांना टार्गेट केलं जातं, असा आरोपा नितेश राणेंनी यावेळी केला होता.
महत्वाच्या बातम्या :
- Gulabrao Patil | “आमचा दसरा मेळावा बघायला बाळासाहेबांचा आत्मा येईल! अन् उद्धव ठाकरेंच्या…”, गुलाबराव पाटलांचा टोला
- Health Tips | तुम्ही उभे राहून पाणी पितात का? तर ही सवय आजच सोडा, कारण आरोग्यासाठी ते आहे अत्यंत हानिकारक..जाणून घ्या!
- Leopard Interesting Facts | सर्वात वेगाने धावणाऱ्या चित्त्यांशी संबंधित जाणून घ्या काही मनोरंजक गोष्टी!
- Eknath Shinde । मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे सुमारे ६२ टक्के काम पूर्ण; २०२३ अखेर प्रकल्प पूर्ण होईल – एकनाथ शिंदे
- Eknath Shinde | जनतेला गुणवत्तापूर्ण सेवा पुरवा ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन


