Share

तर ठरल मग. . . नारायण राणे अखेर एनडीएमध्ये!

Published On: 

वेब टीम : नारायण राणे यांनी काही दिवसांपुर्वी स्वत:च्या नवीन ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्षा’ची घोषणा केली. त्यानंतर दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांनी राणेंना एनडीएमध्ये सामील होण्याचं आमंत्रण दिल होतं. अखेर नारायण राणे यांनी  महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष एनडीएमध्ये सामील होणारं असल्याची घोषणा आज सिंधुदुर्ग मध्ये पत्रकार परिषेदेत केली आहे.

काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर नारायण राणेंनी १  ऑक्टोबर २०१७  रोजी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. त्यानंतर राणेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन भेट घेतली. “मुख्यमंत्र्यांनी एनडीएत येण्याचं आमंत्रण दिलं असून माझा निर्णय दोन दिवसात त्यांना कळवणार आहे,” असं नारायण राणेंनी भेटीनंतर सांगितलं. त्यामुळे राणे एनडीएत सामील होण्याबाबतची अधिकृत घोषणा कधी करणार याकडे लक्ष लागलं होतं. अखेर राणेंनी आज महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने एनडीएत सामील होण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं. दरम्यान नारायण राणे यांच्या घोषणेनंतर सत्तेतील मित्रपक्ष शिवसेना काय भूमिका घेणार हे पहाव लागणारे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!