मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन बंड केलं. यानंतर राज्यातील राजकारणात पूर्ण उलथापालथ झाली. शिवसेनेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यानंतर आता शिवसेना खासदार आणि सामानाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यावर आता भाजप नेते प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया देत ठाकरेंच्या मुलाखतीची खिल्ली उडवली आहे.
“बॅट पण माझी, बॉल पण माझा अन् अंपायर पण माझाच. तसंच उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे वृत्तपत्र पण माझंच, मुलाखत पण माझीच आणि जगप्रसिद्ध संपादक पण माझाच. त्यामुळे उद्धवजी अशा प्रकारच्या मुलाखती देऊन आता चालणार नाही”, असं प्रसाद लाड यावेळी म्हणाले. तसेच “उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावून विधानसभेची आणि लोकसभेची निवडणूक जिंकली आणि त्यांनीच २०१९ ला भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे ठाकरेंनी खंजिराची भाषा करूच नये”, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.
महत्वाच्या बातम्या:
- Prashant Jagtap : आधी भाजपच्या लांडगेंवर टीका, तर आता राष्ट्रवादीच्याच शहराध्यक्षाची आखाड पार्टी
- Sudhir Mungatiwar | “मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव होणार, अन्यथा मी ऑन कॅमेरा…” ; सुधीर मुंनगटीवार यांचा दावा
- Dipali sayyad | संजय राऊतांनी जशी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली तशीच एकनाथ शिंदेंची घ्यावी-दिपाली सय्यद
- Shiv Sena vs MNS : बाळासाहेबांचे खरे राजकीय वारसदार कोण? बाळा नांदगावकर यांचा मोठं वक्तव्य!
- Devendra fadnavis | “मी फिक्स मॅच पाहत नाही”; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

