🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडानंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच सामनाला दिलेल्या मुलाखतीतून पक्षात नेमकं काय घडलं होतं, त्यावर भाष्य केलं आहे. याशिवाय त्यांनी मुख्यमंत्री शिंदेगटातील बंडखोर आमदारांसह भाजपवरही जोरदार आगपाखड केली होती. त्यानंतर आता बंडखोर आमदारांसह अनेक भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करायला सुरुवात केली आहे.
शिवसेनेची पडझड होत असताना उद्धव ठाकरेंकडून त्यांच्या आजारपणाचं भांडवल केलं जात आहे. ठाकरेंना सिंपथी मिळायला पाहिजे होती परंतु त्यांना संपत्ती हवी आहे. शिवसेनेच्या आमदारांनाच पालापाचोळा म्हणणं चुकीचं असल्याचं म्हणत भाजप नेते प्रविण दरेकर यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो वापरताना तुम्ही त्यांच्या वंशजांची परवानगी घेता का?. उलट छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागता, ठाकरेंच्या करणी आणि कथणीत फरत असल्याची खरमरीत टीका दरेकर यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Jayant Patil | मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीतील वाटाघाटीत व्यस्त, राज्याला… – जयंत पाटील
- Nitesh Rane : तुम्ही गुंगीत होता, मग मुलगा दावोसमध्ये काय धिंगाणा घालत होता? नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल!
- Prasad Lad | आजची मुलाखत म्हणजे बॅट पण माझी, बॉल पण माझा,अंपायर पण माझा ! – प्रसाद लाड
- Neeraj Chopra : भारताला मोठा धक्का! स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर
- Uddhav Thackeray | मी आजारी असताना माझ्या पाठीमागे षडयंत्र रचलं गेलं – उद्धव ठाकरे


